Bhagat Singh Koshyari : 'मुख्यमंत्री छा जा रहे है, साथ ही....' राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची एकनाथ शिंदेंवर स्तुतिसुमनं

Bhagat Singh Koshyari : ‘मुख्यमंत्री छा जा रहे है, साथ ही….’ राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची एकनाथ शिंदेंवर स्तुतिसुमनं

| Updated on: Sep 18, 2022 | 12:52 PM

Bhagat Singh Koshyari Video : 'सीएम छाए जा रहे हैं, साथ ही बादल भी छायें जा रहै हे' असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आणि सभागृहात टाळ्यांचा एकच गडगडाट झाला.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari News) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं कौतुक केलंय. ‘मुख्यमंत्री होऊन एकनाथ शिंदे यांना अवघे काही दिवसच झाले आहेत, पण काही दिवसांतच ते प्रसिद्ध झालेत. मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister of Maharashtra) अवघ्या दिवसांतच आपली छाप पाडली’ असं राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटलंय. ‘सीएम छाए जा रहे हैं, साथ ही बादल भी छायें जा रहै हे’ असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आणि सभागृहात टाळ्यांचा एकच गडगडाट झाला. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसावरही त्यांनी अप्रत्यक्षपणे यावेळी मिष्किल भाष्य केलं. यावेळी मुख्ममंत्री एकनाथ शिंदे यांची राज्यपालांनी भरभरुन स्तुती करत उपस्थितांची मनं जिंकली. क्षमा करणं आणि क्षमा मागणं यायला हवं, या मुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्याचा दाखलही राज्यपालांनी यावेळी दिला. भारत जैन महामंडळाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते.

Published on: Sep 18, 2022 12:52 PM