‘कुणबी दाखले द्या’, जरांगे पाटील यांच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, कुणाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार?
VIDEO | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबात मोठी घोषणा केली आहे. ज्यांच्याकडे निजाम काळातील महसुली आणि शैक्षणिक नोंदी आहेत त्या लोकांना कुणबी दाखला मिळणार
मुंबई, ७ सप्टेंबर २०२३ | ‘ज्यांच्याकडे निजाम काळातील महसुली आणि शैक्षणिक नोंदी असतील, त्यांना कुणबी दाखले दिले जातील’, असे म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबात मोठी घोषणा केली आहे. दरम्यान, यासंदर्भात लवकरच जीआर काढण्यात येणार असल्याची माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत ही घोषणा जाहीर करताना असेही सांगितले की, निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात येईल ज्यामार्फत जुन्या नोंदीची तपासणी करण्यात येणार आहे. ही समिती कागदपत्रांची पडताळणी करून पुढील एक महिन्यात अहवाल सादर करणार असल्याचे म्हणत सरकार मराठा आरक्षणासाठी सकारात्मक आहे. सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत, असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.