ड्रोनच्या नजरेतून बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खेड सभेची जंगी तयारी
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी येथील खेडच्या गोळीबार मैदानावर आज जाहीर सभा, ड्रोननं बघा सभेची तयारी
रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज रत्नागिरी येथील खेडच्या गोळीबार मैदानावर जाहीर सभा होणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच यांच मैदानावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. आता त्याच टीकेला एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी या भव्य सभेचं आयोजन केले असून शिवसेनेकडून खेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेच्या पूर्वी वातावरण निर्मिती केली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी जिल्ह्यामधील खेड मधील गोळीबार मैदानातील मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेची जय्यत तयारी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. ही सभा आज सायंकाळी पाच वाजता सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मैदानात शिवसैनिकांसाठी लाखो खुर्च्याची व्यवस्था केल्याचे पाहायला मिळत आहे. सभेच्या ठिकाणी भगवे झेंडे, करारा जवाब मिलेगा अशा आशयाची बॅनरबाजी यांमुळे वातावरण भगवे करण्याचा प्रयत्न या ठिकाणी शिवसेनेकडून करण्यात आला आहे. बघा शिवसेनेच्या या भव्य सभेच्या जंगी तयारीचे ड्रोनच्या नरजेतून दृश्य…