आज बाळासाहेब असते तर… अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
आज बाळासाहेब ठाकरे असते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले असते आणि मोदी यांच्या पाठीवर बाळासाहेब यांनी कौतुकाची थाप दिली असती, त्यांचं अभिनंदन केलं असतं. तर आज अयोध्येत राम मंदिर निर्माण होतंय तर राम मंदिराच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय? असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय.
रत्नागिरी, ८ जानेवारी २०२४ : आज बाळासाहेब ठाकरे असते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले असते आणि मोदी यांच्या पाठीवर बाळासाहेब यांनी कौतुकाची थाप दिली असती, त्यांचं अभिनंदन केलं असतं, अशी खंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. तर आज अयोध्येत राम मंदिर निर्माण होतंय तर राम मंदिराच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय? असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय. अयोध्येतील राम मंदीर हा अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार आहे. सत्तेपेक्षा विचार मोठे असतात. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हीच आपली संपत्ती असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण होत आहे. बाळासाहेबांचं स्वप्न मोदीं पूर्ण करताय. देशात प्रचंड उत्साह आहे. रामावरून बाळासाहेब ठाकरे यांनी कधी राजकारण कधी केलं नाही. बाळासाहेब असते तर मोदींची पाठ थोपटली असती. राम मंदिराच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं गेलं, असेही मुख्यमंत्री म्हणाले.