मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
रायगडमधील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
खालापूर, 20 जुलै 2023 | रायगडमधील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात 200-250 लोकसंख्या असलेलं गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलं गेलं. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 25 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. तर सात जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्याचा आढावा घेतला. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्यात येणार आहेत. तसेच दुर्घटनेतील जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोन करून घटनेची माहिती घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
ठाकरेंना जय महाराष्ट्र अन् भाजपात प्रवेश, तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या...
संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, मागणी काय?
'या' महापालिकेच्या निवडणुकीचा बार उडणार? बघा तुमची महापालिका आहे का?

