संजय शिरसाट अचानक जरांगेंच्या भेटीला, दोघांत काय चर्चा? अंतरवालीत नेमकं काय शिजतंय?

| Updated on: Oct 27, 2024 | 3:46 PM

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला असून अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी देखील विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतल्याने यंदाची निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. संजय शिरसाट आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये जवळपास अर्धातास चर्चा झाली. या भेटीचं कारण गुलदस्त्यात असताना संजय शिरसाट यांनीच माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मनोज जरांगे पाटलांची आज भेट घेतली. त्यात काही गैर नाही, असं मत एकनाथ शिंदे यांच्या शिवेसेनेचे नेते प्रवक्ते संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं. ते पुढे असेही म्हणाले की, ज्या दिवशी लाठीचार्ज झाला त्या दिवसापासून शिवसेनेकडून आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून आम्ही नेहमी मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात राहिलेलो आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधणं आम्हाला कोणत्याही प्रकारे गैर वाटत नाही. मनोज जरांगे पाटील यांची मी रात्री भेट घेतली नाहीतर सकाळी उजेडातच त्यांच्या भेटीला आलो. मी दिवसा आलो आणि त्यांची भेट घेतली काही गोष्टीवर चर्चा झाली माझं त्यांचं मैत्रीचं नातं आहे. ज्या गोष्टी घडतात त्याची एकमेकांना माहिती देणे, त्यावर संवाद साधणं. हाच या भेटीचा अर्थ होता बाकी काही बोलणं झालं नाही, असे संजय शिरसाट यांनी स्पष्ट म्हटलं. तर जी चर्चा झाली ती त्यांच्यातील आणि माझ्यातील आहे. म्हणून ती गुपित राहिलेली बरी, असे संजय शिरसाट यांनी सांगितलं.

Published on: Oct 27, 2024 03:11 PM
‘आमचा कारभार जनतेतून, मी पहाटे उठून…’, हर्षवर्धन पाटलांचा अजित दादांना खोचक टोला
जयंत पाटलांकडून तिसरी यादी जाहीर, आणखी 9 शिलेदार रिंगणात, कुठे होणार राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी लढत?