Shiv Sena | शिवसेना शिंदे गटातील मंत्र्यानं सांगतिला कसा होणार यंदाचा दसरा मेळावा?

Shiv Sena | शिवसेना शिंदे गटातील मंत्र्यानं सांगतिला कसा होणार यंदाचा दसरा मेळावा?

| Updated on: Oct 11, 2023 | 1:16 PM

VIDEO | शिवतीर्थावरील मेळावा म्हणजे काँग्रेसवर टीका, पण आताचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेते स्वतःच्या पक्षाबद्दल बोलण्यापेक्षा राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांचे कौतुक करतात, शिवसेना शिंदे गटातील मंत्र्यानं काय लगावला खोचक टोला

मुंबई, ११ ऑक्टोबर २०२३ | ज्या मैदानावर दसरा मेळावा होईल ती सभा विक्रमी सभा होईल, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला रेकॉर्डब्रेक गर्दी होईल, असे म्हणत शिवसेना शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांनी विश्वास व्यक्त केला तर ज्या ठिकाणी बाकीच्यांचा मेळावा होणार आहे. तिथे स्वतःच्या पक्षाबद्दल बोलण्यापेक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींचं कौतुकच जास्त होईल, असे म्हणत उदय सामंत यांनी ठाकरे गटावर खोचक टोला लगावला. शिवतीर्थावरील मेळावा म्हणजे काँग्रेसवर टीका, पण आताचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांचे कौतुक करतात. त्यामुळे उरलेली शिवसेना ही काँग्रेसमय झाली असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली. तर मैदानाच्या वादामध्ये न जाता जे मैदान आम्हाला मिळेल त्या मैदानावर जोरदार सभा करणं आणि बाळासाहेबांचे विचार शिवसैनिकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा हेतू असल्याचे उदय सामंत म्हणाले.

Published on: Oct 11, 2023 01:16 PM