Special Report | चेंबूरमध्ये खासदार राहुल शेवाळे यांच्यासोबत नेमकं काय घडलं? व्हिडीओ होतोय व्हायरल
VIDEO | चेंबूरमध्ये खासदार राहुल शेवाळे यांच्यासोबत 'त्या' व्हिडीओमध्ये नेमकं काय घडलं, बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे चेंबूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेले होते. मात्र राहुल शेवाळे यांना गद्दार म्हणत तेथील शिवसैनिक आणि भीमसैनिकांनी त्यांना रोखलं असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. आणि या घटनेचा व्हिडीओ त्यांनी जारी केला आहे. दरम्यान, खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाचा हा दावा फेटाळून लावला आहे. त्यांनी म्हटले की, एका व्हिडीओसह माझ्याविषयी गैरसमज पसरवणारी माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली जात आहे. मुळात तसे काही घडले नसल्याचे म्हणत त्यांनी हे विरोधकांचे घाणेरडे राजकारण असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे अमरावतीमध्ये अंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला राणा दाम्पत्यांनी हजेरी लावली असता मात्र त्यावेळी या दोघांना बघून काही लोकांनी भाजपचे दलाल आले अशी घोषणाबाजी केली. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट