खेडच्या सभेतील गर्दीवरून उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्र्यांचा पहिलाच निशाणा; फुसका, आपटीबार अन्...

खेडच्या सभेतील गर्दीवरून उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्र्यांचा पहिलाच निशाणा; फुसका, आपटीबार अन्…

| Updated on: Mar 19, 2023 | 10:15 PM

VIDEO | रत्नागिरीचया खेडमधील गोळीबार मैदानावरून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा एकनाथ शिंदे यांनी घेतला खसपूस समाचार

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपूर्वीच रत्नागिरीतील खेडच्या गोळीबार मैदानात उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील आमदार खासदारांवरही टीका केली होती. दरम्यान, आज त्याच मैदानावर शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर भव्य सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच खेडच्या सभेतील लोकांच्या गर्दीवरून उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधाला. ते म्हणाले, गेल्या आठवड्यातच या मैदानात एक फुसका बार आपटी बार येऊन गेला. मी काही त्याला उत्तर द्यायला आलेलो नाही. तोच तो थयथयाट, आदळआपट नेहमी तेच सुरू असते, त्याला काय उत्तर देणार असे म्हणत यावेळी त्यांनी टीका करणं टाळलं पण उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यात काही अर्थ नसल्याचे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली.

Published on: Mar 19, 2023 08:58 PM