मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; पडद्यामागे नेमकं घडतंय काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटेच दिल्लीला गेले आहेत.हा दौरा पूर्वनियोजित नव्हता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
नवी दिल्ली, 22 जुलै 2023 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे एकटेच दिल्लीला गेले आहेत. त्यात हा दौरा पूर्वनियोजित नव्हता, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विधीमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे, इर्शाळवाडी दुर्घटना, राज्यात जोरदार पाऊस सुरु आहे, या सगळ्या घडामोडीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठमोठे भूकंप होत असल्याने पडद्यामागे नेमकं काय घडतंय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Latest Videos