CM Uddhav Thackeray Discharge| मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. एचएन रिलायन्स रुग्णालयात त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. एचएन रिलायन्स रुग्णालयात त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रिलायन्स हॉस्पिटलचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया केली. सकाळी केल्या जाणाऱ्या चाचणीच्या अहवालानंतर उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज देण्यात आला, त्यानंतर सुपुत्र आदित्या ठाकरे यांच्यासह ते वर्षा या शासकीय निवासस्थानी रवाना झाले.