CM Uddhav Thackeray | लोणावळ्यात विश्रांती घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याच्या दिशेने रवाना

CM Uddhav Thackeray | लोणावळ्यात विश्रांती घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याच्या दिशेने रवाना

| Updated on: Jul 19, 2021 | 5:24 PM

आषाढी एकादशी निमित्त उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजा होणार आहे. शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईहून पंढरपूरकडे चारचाकी वाहनानं रवाना झाले आहेत.मुख्यमंत्री गेल्यावर्षी प्रमाणं यंदाही स्वत: गाडी चालवत पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. मुंबईहून निघाल्यानंतर लोणावळा येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही वेळासाठी विश्रांती घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री पुण्याकडे रवाना झाले […]

आषाढी एकादशी निमित्त उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजा होणार आहे. शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईहून पंढरपूरकडे चारचाकी वाहनानं रवाना झाले आहेत.मुख्यमंत्री गेल्यावर्षी प्रमाणं यंदाही स्वत: गाडी चालवत पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. मुंबईहून निघाल्यानंतर लोणावळा येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही वेळासाठी विश्रांती घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री पुण्याकडे रवाना झाले आहेत. लोणावळ्यात काही वेळ थांबल्यानंतर ते पुण्याकडे रवाना झाले आहेत.  नवी मुंबई पोलिसानंतर, पुणे ग्रामीण पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला सुरक्षा दिली आहे.