Banthia Commission report: बांठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणूक घ्या- सुप्रीम कोर्ट

| Updated on: Jul 20, 2022 | 3:54 PM

निवडणूक कार्यक्रम (election schedule 2022) जसे जाहीर झाले आहे ते तसेच राहतील त्यामध्ये बदल होणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. बांठिया आयोगाच्या अहवालानुसार (Banthia Commission report) निवडणुका घ्या असे आदेशही यावेळी न्यायालयाने दिले. न्यायालयाची दिशाभूल करू नये असे ताशेरे देखील यावेळी ओढण्यात आले. बांठिया आयोगामध्ये कोणताच हस्तक्षेप नाही आणि कुणाला आक्षेप असेल तर […]

निवडणूक कार्यक्रम (election schedule 2022) जसे जाहीर झाले आहे ते तसेच राहतील त्यामध्ये बदल होणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. बांठिया आयोगाच्या अहवालानुसार (Banthia Commission report) निवडणुका घ्या असे आदेशही यावेळी न्यायालयाने दिले. न्यायालयाची दिशाभूल करू नये असे ताशेरे देखील यावेळी ओढण्यात आले. बांठिया आयोगामध्ये कोणताच हस्तक्षेप नाही आणि कुणाला आक्षेप असेल तर या संदर्भामध्ये मागणी करावी असेही कोर्टाने म्हंटले आहे. यानुसार उर्वरित निवडणूका दोन आठवड्यामध्ये जाहीर करा असे आदेश कोर्टाने दिले आहे. निवडणूक वेळेवर झाल्या पाहिजे दोन वर्षांपासून निवडणूका रखडलेल्या आहेत असे सुप्रीम कोर्टाने म्हंटले. 367 ठिकाणी निवडणूक घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानाने दिले आहे.

Published on: Jul 20, 2022 03:52 PM