अदाणींचे पाय सिल्व्हर ओककडे; अदाणी-शरद पवार भेटीने राजकीय चर्चांना उत
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुरावा येणार असे बोलले जात असतानाच आता उद्योगपती गौतम अदाणी यांनी आज सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत थेट सिल्व्हर ओक रस्ता धरला. त्यांनी येथे शरद पवार यांची भेट घेतली
मुंबई : काँग्रेससह देसातील प्रमुख विरोधकांच्या रडावर आलेल्या उद्योगपती गौतम अदाणी यांना फक्त शरद पवार यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या. तर यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुरावा येणार असे बोलले जात असतानाच आता उद्योगपती गौतम अदाणी यांनी आज सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत थेट सिल्व्हर ओक रस्ता धरला. त्यांनी येथे शरद पवार यांची भेट घेतली. त्याचबरोबर तब्बल दोन तास चर्चा केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या भेटीने पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. या भेटीचे नेमके कारण किंवा या भेटीवेळी त्यांच्यासोबतच कोणी होत का याचा तपशील मात्र गुलदस्त्यात आहे. देशभरात विरोधकांनी उद्योगपती गौतम अदाणी यांच्याविरोधात रान उठवलं होतं. तर हिंडेनबर्ग प्रकरणी जेपीसी चौकशीची मागणी केली होती. मात्र, शरद पवार यांनी अदाणी यांनी जेपीसी चौकशी गरज नसल्याचे म्हटलं होतं