‘नाटकात काम करतात की राजकारणात?’, सदावर्ते यांच्यावर कोणाची खरमरीत टीका?
त्यांनी नथुराम गोडसे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी सारखी असल्याचं म्हटलं होतं. त्यावरून आता काँग्रेसकडून टीका केली जात आहे.
मुंबई : विधीतज्ज्ञ गुणरत्न सदावर्ते हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत यश मिळवत शरद पवार यांच्या सारख्या राजकारणीला धक्का दिला आहे. त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. तसेच त्यांनी नथुराम गोडसे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी सारखी असल्याचं म्हटलं होतं. त्यावरून आता काँग्रेसकडून टीका केली जात आहे. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते, नेते राजू वाघमारे यांनी सदावर्ते हे नाटकात काम करतात की राजकारणात तेच कळत नाही असा टोला लगावला आहे. तर स्वतःला विधीतज्ज्ञ समजणारे सदावर्ते यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घटनाच कळली नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर नथुराम गोडसे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारसरणी ही एकच असल्याचं म्हणणाऱ्या सदावर्ते यांना लाज वाटली पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे.