Karnataka New CM : कर्नाटकचा तिढा सुटला? ‘हा’ चेहरा असणार नवा मुख्यमंत्री, दिमतीला 3 उपमुख्यमंत्री
गड जिंकली त्यावर कोणला नेमायचं कोणाला कारभारी करायचं यावरून तिडा पडला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यात स्पर्धा रंगली आहे.
बंगळूरू : काँग्रेसने कर्नाटकमधील विधानसभेची निवडणूक बहुमतात जिंकली. येथे 135 चा आकडा आणत भाजपच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं. त्यामुळे आता कर्नाटकात काँग्रेसचीच सत्ता येणार आहे. मात्र गड जिंकली त्यावर कोणला नेमायचं कोणाला कारभारी करायचं यावरून तिडा पडला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यात स्पर्धा रंगली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करावी, असा प्रश्न काँग्रेससमोर उभा ठाकला आहे. आता यावर दिल्लीत निकाल लागला असून माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यानावावर शिक्कामोर्बत झाल्याची माहिती मिळत आहे. तर कर्नाटकला आता तीन उपमुख्यमंत्री देखील मिळणार अशीही माहिती मिळत आहे. यादरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी निकालानंतर बोलत असताना दोन्ही नेत्यांना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याचा विचार होऊ शकतो, असे संकेत दिले होते. मात्र आता आलेल्या माहितीनुसार माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्याच हेच नवे मुख्यमंत्री होतील.