महाविकास आघाडीमधील जागा वाटपाबाबत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याकडून मोठा खुलासा, म्हणाले...

महाविकास आघाडीमधील जागा वाटपाबाबत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याकडून मोठा खुलासा, म्हणाले…

| Updated on: May 17, 2023 | 2:55 PM

VIDEO | काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याकडून जागा वाटपाच्या चर्चांचं खंडण, नेमकं काय म्हणाले बघा...

नांदेड : लोकसभा निवडणुकीसाठी वर्षभराचा कालावधी असला तरी महाविकास आघाडीनं आतापासूनच तयारीला सुरूवात केली आहे. तर प्रत्येकी १६ जागांवर चर्चा झाल्याचे समोर येत आहे. लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ जागांचं कसं वाटप करायचं याची चर्चा सुरू झाल्याची माहिती राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी दिल्याचे समोर आले होते. मात्र या सुरू असलेल्या या जागा वाटपाच्या चर्चांचं खंडण काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याकडून करण्यात आले आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबतची अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी प्रतिक्रीया काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. जागावाटपाबाबत सुरू असलेल्या चर्चा चुकीच्या आणि निराधार आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बैठक झाली आणि त्यात काँग्रेसला सर्वात कमी जागा देण्याचा फॉर्म्युला ठरल्याचे वृत्त काही माध्यमात प्रसारित झाले होते, त्यावर चव्हाण यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

 

 

 

 

 

Published on: May 17, 2023 02:55 PM