‘गतिमान सरकारला 90 दिवसानंतर आयुक्त निवडीला सवड मिळाली’; काँग्रेस नेत्याचा सरकारला टोला
तक्तालिन आयुक्त कादंबरी बलकवडे यांची बदली झाल्याने कोल्हापूर महापालिकेला आयुक्त नव्हता. तर दोन महिने उलटले तरी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली नव्हती.
कोल्हापूर : 23 ऑगस्ट 2023 | गेल्या दोन महिन्यापासून कोल्हापूर महापालिकेचे आयुक्ती पदी नियुक्ती रखडली होती. त्यावरून सर्वच राजकीय पक्षांकडून याबाबत शासन दरबारी मागणी केली जात होती. तर अनेक संघटनांकडून कोणी आयुक्त देता का आयुक्त अशा आशयाने आंदोलन केलं जात होत. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी हा प्रश्न आपण मार्गी लावू असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्यानंतर आता कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्ती पदी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती झाली आहे. त्या आज बुधवारी (दि.२३) आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. मात्र याच्या आधी काँग्रेसचे नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सरकारला टोला लगावला आहे. त्यांनी गतिमान सरकारला 90 दिवसानंतर आयुक्त निवडीला सवड मिळाली असा टोला लगावला आहे.
Published on: Aug 23, 2023 07:45 AM
Latest Videos