Nana Patole | 'पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा कॉंग्रेस कधी कमी होऊ देणार नाही'

Nana Patole | ‘पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा कॉंग्रेस कधी कमी होऊ देणार नाही’

| Updated on: Jan 18, 2022 | 11:13 AM

पंतप्रधान पदाची गरीमा काँग्रेस(Congress)ला माहिती आहे. आज पंतप्रधानांचं नाव घेऊन भाजपा (BJP) आंदोलन करत आहे. त्यामुळेच भाजपाच पंतप्रधान पदाची गरिमा समजत नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलीय.

मी मोदी नावाच्या गावगुंडाबाबत बोललो होतो. पंतप्रधान पदाची गरीमा काँग्रेस(Congress)ला माहिती आहे. आज पंतप्रधानांचं नाव घेऊन भाजपा (BJP) आंदोलन करत आहे. त्यामुळेच भाजपाच पंतप्रधान पदाची गरिमा समजत नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलीय. आंदोलन करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांविरोधात पोलीस तक्रार करणऱ्याच्या सूचना काँग्रेस कार्यकर्त्यांना देणार आहे. आता काँग्रेसही आक्रमक आहे. त्या व्हिडिओ क्लीपमध्ये काही प्रमाणात एडिटिंग करण्यात आलंय. सायबरकडे तक्रार करणार, असंही ते म्हणाले.