सरकारमध्ये लंगडी आणि कबड्डीचा खेळ, कॉंग्रेस नेत्याची सडकून टीका

सरकारमध्ये लंगडी आणि कबड्डीचा खेळ, कॉंग्रेस नेत्याची सडकून टीका

| Updated on: Sep 22, 2023 | 11:54 PM

एकमेकांसोबत भांडून राज्य केलं जातं नाही. राज्यात जे चाललं आहे ते चुकीचे आहे. महाराष्ट्रात परिवर्तन निश्चित आहे. सरकारमध्ये लंगडी, कबड्डी चालली आहे. मराठा आरक्षण संदर्भात पत्रकार परिषद झाली तेव्हा महाराष्ट्राने ते बघितलं...

मुंबई : 22 सप्टेंबर 2023 | आमदार अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार सध्या राहुल नार्वेकर यांना आहे. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी प्रतित्रापत्रात सांगितलं सुप्रिम कोर्ट जो निर्णय घेईल तो आम्ही मान्य करू. आता सुप्रिम कोर्टानं हा निर्णय पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला आहे. शेड़्युल 10 अंतर्गत विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेचा निर्णय घेवू शकतात. मात्र, आमदार अपात्रतेची लांबलेली सुनावणी वेळकाढूपणा महाराष्ट्राच्या विधानसभा पंरपरेसाठी घातक आहे अशी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. सत्तेत वेड्याचं सरकार बसलेले आहेत. या सरकारला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण याचे आश्वासन २०१४ मध्ये दिले होते. मग आता का पळ काढत आहेत, असा सवाल त्यांनी केला.

Published on: Sep 22, 2023 11:54 PM