AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patole | कोकणातील पूरग्रस्तांसाठी वाढीव मदतीची मागणी करणार : नाना पटोले

| Updated on: Aug 05, 2021 | 8:23 PM

चिपळूणसह नद्याचां गाळ व बंधारेबाबत मुख्यंमत्र्यांशी बोलणार. राज्य सरकारकडून आणखी मदत मिळावी यासाठी काँग्रेस मुख्यमंत्र्याची भेट घेणार असल्याचे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सांगितले.

रायगड : राज्य सरकारने घोषित केलेली मदत ही वाढवून देण्याचा प्रयत्न केला आहे. 5000 जिथे असतात तिथे 10 हजार घोषित केले आहे. केंद्राकडून GST सह विविध टँक्सचे 1 लाख कोटी येणे बाकी आहे.  मागच्या चक्रीवादळामध्ये पंतप्रधान गुजरातच्या बाँर्डरवर आले पण महाराष्टात आले नाही आणि हजार कोटी दिले. हे त्याचं दायित्व आहे. उपकार करत नाही. आपल्या घामाचा पैसा कडे विविध पद्धतीने NDRF कडे जातो. संपूर्ण देशात हा पैसा द्यायचा असतो एकट्या गुजरातला नाही. मागील एका वर्षात तीन वेळा आपत्ती राज्यावर आली. राज्य सरकारने योग्य ती मदत तर केलीच पाहिजे. चिपळूणसह नद्याचां गाळ व बंधारेबाबत मुख्यंमत्र्यांशी बोलणार. राज्य सरकारकडून आणखी मदत मिळावी यासाठी काँग्रेस मुख्यमंत्र्याची भेट घेणार असल्याचे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सांगितले.