‘मग ‘त्या’ मराठ्यांनी काय घोडं मारलंय का?’ पृथ्वीराज चव्हाण यांचा थेट सरकारला सवाल
VIDEO | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल, मराठवाड्यातील मराठा वगळता इतर भागातील मराठ्यांच्या संदर्भात थेट केली विचारणा
सांगली, ११ सप्टेंबर २०२३ | मराठवाड्यातल्या मराठा समाजाला मागासवर्गीय आरक्षण दिले तर मग पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडं मारलं आहे का? असा सवाल करत आताच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत फारच चुकीचा निर्णय घेतला असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. यावेळी पृथ्वीराज चव्हाण देखील दिल्लीतून आले, मग त्यांनी का आरक्षण दिले नाही या अजित पवार यांनी केलेल्या टिकेवर देखील पृथ्वीराज चव्हान यांनी उत्तर दिले. आज अजितदादाना पक्षांतरामुळे विसर पडलेला दिसतो की मी मुख्यमंत्री असताना आपण सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण दिले आणि त्यावेळी ते माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते असे चव्हाण म्हणालेत. आज सरकार निजाम कालीन कागदपत्र , पुरावे दाखले ग्राह्य धरते पण शाहू महाराजांचे दाखले सरकार ग्राह्य का धरत नाही, हा कोणता न्याय आहे असे म्हणत यावरही पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे.