काँग्रेसचे रवींद्र धंगेकर शिवसेनेच्या वाटेवर? ‘त्या’ स्टेटस अन् भेटीगाठीच्या चर्चांनंतर स्पष्टच म्हणाले, ‘जाताना लपून जाणार…’
रवींद्र धंगेकर आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पुण्यात लवकरच काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याची वर्तवली जात आहे. रवींद्र धंगेकर यांनी नुकतंच टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना शिवसेना शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले.
काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी गुरूवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी रवींद्र धंगेकरांसह ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबरही उपस्थित होते. रवींद्र धंगेकर आणि शिंदेंच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात. या भेटीनंतर रवींद्र धंगेकर यांच्याशी थेट टीव्ही 9 मराठीने संवाद साधला असता या भेटीवर त्यांनी खुलासा केला आहे. मी कार्यकर्त्यांसोबत बोलणार. जाताना मी लपून जाणार नाही. गेल्या ३० वर्षांपासून लोकांसाठी रस्त्यावर लढतोय, असं धंगेकरांनी स्पष्ट केले आहे. तर रवींद्र धंगेकर यांनी एक स्टेटस ठेवलं होतं. ज्यामध्ये भगवी टोपी आणि भगवा शेला त्यांच्या खांद्यावर दिसतोय. इतकंच नाहीतर हे नाव पुन्हा ऐकण्याची तयारी ठेवा असं कॅप्शन त्या फोटो खाली दिले आहे. यावरून देखील धंगेकर शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले होते. यासंदर्भात प्रश्न केला असता धंगेकर म्हणाले, ‘दोन दिवसांपूर्वी शिवजंयती होती. यानिमित्ताने मी सर्व शिवभक्तांसाठी एक छोटा कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळी वेगवेगळे कार्यकर्ते उपस्थित होते. मी मला जे स्टेटस आवडतात ते स्टेटसला ठेवत असतो. एखाद्या सर्वसामान्याने केलेले फोटो किंवा रिलही मी स्टेटसला ठेवतो. माझा तो फोटो खूप चांगला आला होता. मला तो आवडला. यानंतर मग मी शिवसेनेत जाणार अशा चर्चा रंगल्या’, असे रवींद्र धंगेकर म्हणाले.

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा

'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी

मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले

पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
