ज्यासाठी मोदींच्या परवानगीची गरज नाही, त्याबद्दल त्यांचे आभार मानणे योग्य नाही, सचिन सावंत यांचा फडणवीसांवर निशाणा

| Updated on: Apr 26, 2021 | 5:43 PM

ज्यासाठी मोदींच्या परवानगीची गरज नाही. त्याबद्दल त्यांचे आभार मानणे योग्य नाही, सचिन सावंत यांचा निशाणा

मुंबई: काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत आपण जी यादी दाखवून मोदीजींना श्रेय देत आहात. त्यामध्ये महाराष्ट्रात असलेल्या प्रकल्पांचा समावेश आहे. 1250 मे.टन ही महाराष्ट्राची निर्माण क्षमता आहे. यासाठी मोदींच्या परवानगीची गरज नाही. त्याबद्दल त्यांचे आभार मानणे योग्य नाही. हा मोदी सरकारचा धूर्तपणा आहे., असं ट्विट त्यांनी केलं आहे.