pawar meet adani | शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीवर काँग्रेसच्या बड्या नेत्याचं भाष्य, म्हणाले…
VIDEO | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतली उद्योगपती गौतम अदानी यांच्या अहमदाबाद येथील निवासस्थानी भेट, पवार-अदानी भेटीवर काँग्रेसच्या बड्या नेत्याचं भाष्य, काय दिली प्रतिक्रिया?
नागपूर, २३ सप्टेंबर २०२३ | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे उद्योगपती गौतम अदानी यांच्या अहमदाबाद येथील निवासस्थानी दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. अहमदाबाद येथे शरद पवार हे गौतम अदानी यांच्याच घरी झालेल्या बैठकीबाबत असे सांगितले जात आहे की, एका खासगी कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी शरद पवार हे अदानी यांच्या भेटीला आले होते. शरद पवार आणि अदानी यांच्या आजच्या भेटीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले आहे ते म्हणाले, शरद पवार यांनी अहमदाबादमध्ये जाऊन गौतम अदानी यांची भेट घेतली. त्यामुळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीमुळे संभ्रम निर्माण होतोय. याबाबत शरद पवार यांनीच हा संभ्रम दूर करावा, असे भाष्य करत विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार यांना आवाहन केले आहे.