Vijay Wadettiwar यांची शिवसेनेतील अपात्र आमदारांसंदर्भात मोठी मागणी, बघा काय म्हणाले?

Vijay Wadettiwar यांची शिवसेनेतील अपात्र आमदारांसंदर्भात मोठी मागणी, बघा काय म्हणाले?

| Updated on: Sep 23, 2023 | 12:57 PM

VIDEO | शिवसेनेच्या अपात्र आमदारांच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसंदर्भात विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काय केली मोठी मागणी? म्हणाले...

मुंबई, २३ सप्टेंबर २०२३ | शिवसेना पक्ष आणि शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील या सुनावणीचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेवरील निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना घेण्यास सांगितला त्यामुळे ही सुनावणी राहुल नार्वेकर यांच्या समोर होत आहे. अशातच राज्याच्या विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या सुनावणीसंदर्भात मोठी मागणी केली आहे. ‘शिवसेनेच्या अपात्र आमदारांची सुनावणी विधानसभा अध्यक्षांनी लाईव्ह करावी, जेणेकरून काय चाललंय नेमकं ते लोकांना कळेल आणि सत्य परिस्थिती समोर येईल. अपात्र आमदारांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जेव्हा खटले चालतात. त्यावेळी ते लाईव्ह सगळ्यांना बघायला मिळतात. आज महाराष्ट्रात मोठा घटनाक्रम घडला आहे. असा परिस्थितीत विधानसभा अध्यत्र जी सुनावणी करणार ती लाईव्ह करावी’, असे ते म्हणाले.

Published on: Sep 23, 2023 12:57 PM