‘असा चिल्लरपणा…’ कॉंगेस आमदार संतापले, ‘या’ चार बड्या नेत्यांविरोधात आणणार हक्कभंग
काही राजकीय लोकं आम्ही मंजूर केलेल्या कामाचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत आहे. निर्लज्जपणे आमदाराचे नाव भूमिपूजनाच्या कार्यक्रमातून वगळले जाते. असला चिल्लरपणा कधीही पाहिला नाही. त्यामुळे येत्या अधिवेशनात अधिकारी आणि चार नेत्यांविरोधात हक्कभंग आणणार आहे.
अमरावती | 28 ऑक्टोबर 2023 : जर उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र झाले आणि दुसरा कोणी भाजपचा मुख्यमंत्री झाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. हे सरकार अवैध मार्गाने आले आहे. भाजप बहुजनांचा उपयोग करून घेतो आणि नंतर त्यांना फेकून देतो अशी टीका कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केली. समाजामध्ये समाजामध्ये भांडण लावण्याचे काम भाजपच्यावतीने केले जात आहे. आम्ही आमदार म्हणून काही कामे मागील सरकारमध्ये मजूर केली होती. शिंदे सरकारने त्यावर स्थगिती आणली. अनेक प्रयत्न करून ती कामे पुन्हा मंजूर करून घेतली. काही कामे कोर्टातून मंजूर करून घेतली. पण, विकासकामांच्या कामाच्या भूमिपूजनात हेतुपुरस्सर डावलले जात आहे. भूमिपूजन कार्यक्रमातून आमची नावे वगळली. विरोधी पक्षाचे आमदार असले तरी आमचेही काही अधिकार आहेत. असा चिल्लरपणा कधीही पाहिला नाही. त्यामुळे येत्या अधिवेशनात पालकमंत्री, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याविरोधात हिवाळी अधिवेशनात हक्कभंग आणणार असा इशारा त्यांनी दिला.