Rahul Gandhi Plea | राहुल गांधी यांना मोठा झटका; ‘ती’ याचिका न्यायालयाने फेटाळली; होणार अडचणीत वाढ
मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेला स्थगिती मिळावी, यासाठी राहुल गांधी यांनी सूरत कोर्टात धाव घेतली होती. मात्र, या प्रकरणात राहुल गांधींना दिलासा देण्यास कोर्टाने नकार देत त्यांची याचिका फेटाळली आहे
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मोदी आडनावाच्या मानहानीप्रकरणी राहुल गांधी यांनी सुरत न्यायालयात अपील याचिका दाखल केली होती. ती याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे हा निर्णय राहुल गांधी यांना झटका मानला जात आहे. मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेला स्थगिती मिळावी, यासाठी राहुल गांधी यांनी सूरत कोर्टात धाव घेतली होती. मात्र, या प्रकरणात राहुल गांधींना दिलासा देण्यास कोर्टाने नकार देत त्यांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे तुर्तास तरी त्यांची खासदारकी मिळणार नाही. त्यामुळे आता त्यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ होणार असून आता काँग्रेस पुढे काय पाऊले टाकणार? सत्र न्यायालयाच्या या निकाला ते उच्च न्यायालयात आव्हान देणार का? तर उच्च न्यायालयात तरी राहुल गांधी यांना दिलासा मिळणार का? याकडे देशाचे लक्ष लागले आहे.