नाना पटोले यांचा नितीन गडकरी यांच्यावर अप्रत्यक्ष निशाना, म्हणाले, ‘आमचे नागपुरचे नेते…’
पटोले यांनी, देशातील किती प्रॉपर्टी मोदी यांनी विकली? याची एक यादी त्यांनी जाहीर करावी नसेलच तर ती आम्ही देऊ. तसेच सध्या दिल्लीच्या मोदी सरकारच्या विरोधात कोणीच बोलत नाही.
सोलापूर : देश विकणारे लोक हे देशप्रेमी आहेत असं फडणवीस सांगत असतील तर देशप्रेमाची व्याख्या काय हे त्यांनी सांगावं असा टोला काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. याच वेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर देखील निशाना साधला. यावेळी पटोले यांनी, देशातील किती प्रॉपर्टी मोदी यांनी विकली? याची एक यादी त्यांनी जाहीर करावी नसेलच तर ती आम्ही देऊ. तसेच सध्या दिल्लीच्या मोदी सरकारच्या विरोधात कोणीच बोलत नाही. राज्यातील कोणताच नेता यावर बोलत नाही आणि बोलूही शकत नाही असा घणाघातच केला. तर काही नेते बोलायचे. नागपूरचे नेते बोलत होते. पण तेही आता चूप झाले असा टोला पटोले यांनी गडकरी यांचे नाव न घेतो लगावला आहे. त्यामुळे यावर आता गडकरी यांच्याकडून कोणती प्रतिक्रिया येते हे पहावं लागेल. maharashtra politics