राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मार्ग मोकळा, मात्र पटोले म्हणतात, ‘होऊ तर द्या, त्यांना भवितव्य…’
सुप्रीम कोर्टाने स्थगिती घालतेली स्थगिती आता उटवण्यात आल्याने शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून आता नवी यादी राज्यपाल यांच्याकडे पाठविण्यात येईल. त्यामुळे आता नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई, 27 जुलै 2023 | राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. सुप्रीम कोर्टाने स्थगिती घालतेली स्थगिती आता उटवण्यात आल्याने शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून आता नवी यादी राज्यपाल यांच्याकडे पाठविण्यात येईल. त्यामुळे आता नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात जागा वाटपाचा फार्म्युला ठरला असून भाजपला ६ शिंदे गटाला ३ आणि अजित पवार यांच्या गटाला ३ जागा मिळतील असे सांगण्यात येत आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. पटोले यांनी, भाजप हे संविधान मानणारं नाही. तत्कालिन महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी देण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारच्या दबावाखाली येत तत्कालिन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी कटकारस्थान करून ती फाईल दाबून टाकली असा घणाघात त्यांनी केलाय. तर भाजपने सरकार भ्रष्टाचारानं बदललं. पण आता राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मात्र यावरून अनेक लोक न्यायालयात जाणार आहेत. त्यामुळे त्यांचे भवितव्य चागले राहणार नाही असाही दावा त्यांनी केला आहे.