नाना पटोले यांच्याकडून त्या विधानाचा पुनरूच्चार, म्हणाले, ‘मित्रत्वाच्या नात्याने सल्ला देतोय, सावध व्हा…’
मुख्यमंत्र्यांच्या एका खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्री डोळा असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. तसेच सरकारमध्ये सावळा गोंधळ सुरु असल्याची टीका देखील त्यांनी केली होती.
मुंबई, 15 ऑगस्ट 2023 | शिंदे-फडणवीस-पवार सरकार हे गम्मत जम्मतचे सरकार आहे. मुख्यमंत्र्यांच्या एका खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्री डोळा असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. तसेच सरकारमध्ये सावळा गोंधळ सुरु असल्याची टीका देखील त्यांनी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील चांदणी चौक उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या भाषणातच विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांचा खरपूस सामाचार घेतला होता. तर अरे आम्ही काय बेअक्कल आहे का? खुर्ची एक असेल तर तिथे दोघांचा डोळा ठेवून कसं काय चालेल? आणि ती खुर्ची भरलेली आहे ना बाबा.. व्यक्ती बसलेली आहे. असा खरिमरीत टोला लगावला होता. त्यानंतर हे प्रकरण शांत होईल असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा नाना पटोले यांनी दुसऱ्यांना तेच वक्तव्य केलं आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर दोन्हा उपमुख्यमंत्र्या डोळा असल्याचं म्हटलं आहे. तर मित्र म्हणून शिंदे यांना सल्ला देते की त्यांनी सावध राहावं. यामुळे आता राज्याच्या राजकारणातील तापमान पुन्हा एकदा तापलं आहे.