काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, नेमकं काय म्हणाले?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अशोक चव्हाण यांच्यावर प्रतिक्रिया देण्याचे कारण नाही. अशोक चव्हाण प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचे नाहीत, असं नाना पटोले यांनी म्हटले आहे.
काँग्रेसने ज्या व्यक्तीला इतकं मोठा केलं. त्या व्यक्तीकडून अशी अपेक्षा नाही, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पुढे नाना पटोले असेही म्हणाले की, अशोक चव्हाण यांच्यावर प्रतिक्रिया देण्याचे कारण नाही. अशोक चव्हाण प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचे नाहीत, असं म्हणत त्यांनी अशोक चव्हाण यांनी थेट लायकीच काढल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांच्यावर सविस्तर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. दरम्यान, नाना पटोले यांनी महायुती सरकारमध्ये खातेवाटपानंतर आता पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. यावरही नाना पटोले यांनी भाष्य केले आहे. ‘महायुती सरकार हे लोकातून निवडून आलेल्या सरकार नाही. निवडणूक आयोग आणि भाजपच्या सिंडिकेट मधून आलेल्या सरकार आहे. त्यामुळे लोकांचे घेणं-देणं यांना नाही. लोकांना कसे लुटता येईल, मलाईदार खाते, मलाईदार जिल्हे कसे मिळतील यावर सगळा जोर सुरू आहे, असा आरोपच नाना पटोले यांनी राज्य सरकार केला. बघा काय म्हणाले नाना पटोले?