Special Report | लोढा यांच्या कार्यालयात भाजपचे माजी नगरसेवक; काँग्रेस-ठाकरे गटाचा विरोध
दुसरीकडे मुंबई महापालिकेतील भाजपच्या मंत्र्यांच्या कार्यालयावरून काँग्रेस-ठाकरे गट हा आक्रमक झाला आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी त्यांचे कार्यालय मुंबई महापालिकेत थाटले आहे. त्यावरून ठाकरे गटाकडून विरोध केला जात आहे.
मुंबई | 26 जुलै 2023 : एकीकडे राज्याच्या पावसाळी अधिवेशनात निधी वाटपावरून विरोधक-सत्ताधारी आमने सामने आले आहेत. निधी वाटपाच्या कारणावरून थेट अजित पवार यांच्यावर आरोप केले जात आहेत. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेतील भाजपच्या मंत्र्यांच्या कार्यालयावरून काँग्रेस-ठाकरे गट हा आक्रमक झाला आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी त्यांचे कार्यालय मुंबई महापालिकेत थाटले आहे. त्यावरून ठाकरे गटाकडून विरोध केला जात आहे. तर आमदार आदित्य ठाकरे यांनी यावरून थेट टीका करताना, लोढा यांना महापालिकेत कार्यालय कशासाठी असा सवाल केला आहे. तसेच ते २४ तासात मोकळं करा अन्यथा असा इशारा दिला आहे. तर याचकारणावरून काँग्रेसचे नेते आमदार भाई जगताप यांनी देखील लोढा यांच्या या कार्यालयावरून टोला लगावला आहे. जगताप यांनी, मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर भाजपचा डोळा असल्याचा आरोप करताना लोढा हे पालकमंत्रीच्या आधी एक बिल्डर असल्याचा टोला असा लागवला आहे. सध्या लोढा यांच्या कार्यालयावरून विरोध वाढत असून काय आरोप करण्यात आले आहेत. त्यावर हा टिव्ही 9 मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट…