पंतप्रधान मोदी यांच्या भ्रष्टाराच्या मुद्द्यावर घमासान? काँग्रेसकडून पलटवार, ट्विट करत उत्तर
77 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली होती. त्यावेळी त्यांनी भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण या तीन गोष्टींवरून काँग्रेसवर निशाना साधला होता.
मुंबई :17 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी 77 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहन केलं. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केले. तसेच त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. तर भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण या तीन दुष्प्रवृत्तीविरोधात लढा देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी म्हटलं होतं. त्यावरून आता काँग्रेसने प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भ्रष्टाचाराच्या या मुद्द्यावरून काँग्रेसकडून एक ट्विट करण्यात आलं असून त्यात भाजपमध्ये सामिल झालेल्या नेत्यांचे फोटो देखील या ट्विटमध्ये वापरण्यात आले आहेत. तसेच अजित पवार गटावर देखील काँग्रेसकडून निशाना साधण्यात आला आहे. तर अजित पवार, छगन भूजबळ आणि हसन मुश्रीफ यांचे फोटो या ट्विटमध्ये वापरण्यात आले असून पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाना साधण्यात आला आहे.

