Rahul Gandhi | राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीमुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, थेट दिल्लीतून
. ईडीच्या मुख्यालयात राहुल गांधींच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. नोटीस आल्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस नॅशनल हेराल्डप्रकरणी पाठवण्यात आली आहे. ईडीच्या मुख्यालयात राहुल गांधींच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. नोटीस आल्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राहुल गांधींच्या हजेरीपूर्वी प्रियांका गांधी वाड्रा त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचल्या. येथून राहुल-प्रियांका काँग्रेस मुख्यालयात पोहोचले आणि पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह पक्षाचे खासदार आणि इतर नेते पायी चालत ईडी कार्यालयाकडे रवाना झाले. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून काँग्रेसचा मोर्चा थांबवला. मोर्चा काढायला कुठचंही शक्ती प्रदर्शन करायला दिल्ली पोलीसांकडून बंदी घालण्यात आलेली आहे. तरी सुद्धा हजारोच्या संख्येने कार्यकर्तो जमले. मोठ्या संख्येने कार्यकर्ते कॉग्रेस मुख्यालया बाहेर जमले. अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी बॅरिकेड्स लावून अडवलं.