कलेक्टरिन बाईंचं अख्ख कुटुंबच वादात, दमदाटी कुणाच्या जीवावर? खेडकरांचा गॉडफादर कोण?
खेडकरांची आई मनोरमा खेडकरांनी काही शेतकऱ्यांना थेट पिस्तुल दाखवून धमकावलं होतं. त्यावरूनही नवा वाद सुरू झालाय. सरकारी कार्यालयात दमदाटी आणि बोगस कागदपत्रांच्या ओरापात जिल्हाधिकारी पूजा खेडकरांचं निलंबन होण्याची शक्यता आहे. तर यूपीएससीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय
IAS अधिकारी पूजा खेडकर वादात राहिल्यानंतर आता त्यांच्या कुटुंबांचेच अनेक कारनामे समोर येताय. त्यांच्या आई मनोरमा खेडकरांनी काही शेतकऱ्यांना थेट पिस्तुल दाखवून धमकावलं होतं. त्यावरूनही नवा वाद सुरू झालाय. सरकारी कार्यालयात दमदाटी आणि बोगस कागदपत्रांच्या ओरापात जिल्हाधिकारी पूजा खेडकरांचं निलंबन होण्याची शक्यता आहे. यूपीएससीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिल्याने केंद्राच्या अतिरिक्त सचिव यांना दोन आठवड्यात अहवाल सुपूर्दतेचे आदेश दिले गेलेत. इतकंच नाहीतर खेडकरांच्या आई हातात पिस्तुल घेऊन मुळशीतील शेतकऱ्यांना दमदाटी करतानाचा व्हिडीओ व्हायरल होताय. यामध्ये खेडकर आणि जमिनीचा मालक यांच्यातील मूळ वाद कोर्टात असताना जमिनीच्या मालकीवर दमदाटी केली. बघा स्पेशल रिपोर्ट
Published on: Jul 13, 2024 11:10 AM
Latest Videos