Ganesh Mandal : गणेश मंडळाच्या देखाव्याचा वाद, थेट कोर्टात खटला, काय आहे प्रकरण?
कल्याणमधल्या विजय तरुण मंडळानं हा देखावा तयार केला होता. शिवसेनेचे पदाधिकारी विजय साळवी यांचं हे मंडळ आहे. शिवसेनेला वटवृक्ष दाखविलं गेलंय. पक्षनिष्ठेवर चित्रदेखावा साकारण्यात आला होता.
मुंबई : गणेश मंडळाच्या देखाव्याचा वाद चक्क कोर्टात गेलाय. कल्याणमध्ये शिंदे-ठाकरे सत्तानाट्यावरून एक देखावा साकारण्यात आला होता. त्यावर आक्षेप घेतला गेला. त्यानंतर पोलिसांनी भल्या पहाटे हा देखावा हटविला. या ठिकाणी गणपती बसणार होता. पण, त्याऐवजी पहाटेच पोलीस पोहचले. मंडळानं उभा केलेला देखावा हटविण्यास सुरुवात झाली. एक-एक करून पोलिसांनी सर्व देखावा काढला. कारण या देखाव्यात राज्यातल्या सत्तानाट्याच्या घडामोडी दाखविण्यात आल्या होत्या. त्यानंतर हा गणपती मंडळाच्या देखाव्याचा वाद थेट कोर्टात पोहचला. कल्याणमधल्या विजय तरुण मंडळानं हा देखावा तयार केला होता. शिवसेनेचे पदाधिकारी विजय साळवी यांचं हे मंडळ आहे. शिवसेनेला वटवृक्ष दाखविलं गेलंय. पक्षनिष्ठेवर चित्रदेखावा साकारण्यात आला होता.