Waghya Dog Controversy : रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, ‘वाघ्या’ कथा की इतिहास? सरकार सोक्षमोक्ष करणार?
रायगड किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या समाधीसमोरील वाघ्या कुत्र्याच्या प्रतिकृतीबाबतचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खासदार संभाजी राजे यांनी प्रतिकृती हटवण्याची मागणी केली आहे, तर संशोधक संजय सोनवणी यांनी त्याला विरोध केला आहे. हा वाद शतकानिमित्त सुरू असून त्याच्या इतिहासाचा आणि पुराव्यांचा विचार करणे आवश्यक आहे.
गेले अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा वाद पुन्हा एकदा सुरू झाला आहे. माजी खासदार संभाजी राजे यांनी रायगडावरील महाराजांच्या समाधी समोरील वाघ्या श्वानाच्या अस्तित्वाचे कोणतेही पुरावे नाही. त्यामुळे ती प्रतिकृती हटवली जावी, यासाठी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले. तर या विरोधात अभ्यासक संजय सोनवणी यांनी पुरावा असल्याचं सांगत प्रतिकृती हटवण्यास विरोध केला आहे. माहितीनुसार वाघ्या श्वानाच्या प्रतिकृतीचा हा वाद जवळपास 100 वर्षांपासून सुरू आहे. ज्यावेळी ही प्रतिकृती उभारण्यात आली, तेव्हापासून आजपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवर हा वाद पुन्हा-पुन्हा होत आला आहे. शिवाजी महाराजांसोबत एक वाघ्या नावाचा श्वान असायचा त्याने महाराजांच्या मृत्यूनंतर अग्नी चितेत उडी घेतल्याचं बोललं जातं मात्र ही कथा आहे की इतिहास यावरून वाद आहेत. दरम्यान, वाघ्या कुत्र्याचे जर्मन कागदपत्रात पुरावे आहेत, असं अभ्यासक संजय सोनवणी यांनी म्हटलंय. ‘हा जर्मन पुरावा अत्यंत महत्त्वाचा आहे . तो आपण बेदखल करावा असं त्यात काही नाही आणि आजतागायत गेलेल्या 13 वर्षात हा जो पुरावा मी जेव्हा समोर आणला होता, आतापर्यंत एकाही या कुत्र्याच्या विरुद्ध ज्यांची मत असतील त्यांनी एकाही हा पुरावा चुकीचा आहे हे सिद्ध करून दाखवले नाही, असंही संजय सोनवणी यांनी म्हटलंय.

'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट

2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं

धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका

31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला
