Corona Update : देशासह महाराष्ट्राचं पुन्हा टेन्शन वाढलं, कोरोनाचं कमबॅक, कुठं किती रुग्ण आढळले?
देशात आणि महाराष्ट्रातील नागरिकांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. कारण देशात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. देशात २ आठवड्यात १६ जणांचा कोरोना व्हायरसने मृत्यू झाला आहे. देशात गेल्या २४ तासात ३४१ नवे कोरोना रूग्ण तर राज्यात १४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद
मुंबई, २० डिसेंबर २०२३ : देशात आणि महाराष्ट्रातील नागरिकांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. कारण देशात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. देशात २ आठवड्यात १६ जणांचा कोरोना व्हायरसने मृत्यू झाला आहे. देशात गेल्या २४ तासात ३४१ नवे कोरोना रूग्ण तर राज्यात १४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यासह राज्यात सध्या ४५ हून अधिक कोरोना रूग्ण आहेत. यासह केरळ राज्यात एकूण २९२ पैकी ३ रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रासाठी खरंतर ही धोक्याची घंटा मानली जात आहे. महाराष्ट्रात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी ४५ वर पोहोचली आहे. यामध्ये मुंबईतील २७ , ठाण्यातील ८, रायगड १, पुणे ८, कोल्हापूरमधील १ रुग्णाचा समावेश आहे. कोरोनाबाधितांचा आकडा सारखा वाढतोय. देशात सध्या २३११ सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत.