बदला घेण्यासाठी अदानीच्या मागे का उभे आहात?; संजय राऊत यांचा सवाल
पंतप्रधान मोदी हे बदला कोणाशी घेत आहेत? का घेत आहेत? बदला घेण्यासाठी ते अडाणीला का वाचवता? देश लुटणाऱ्या गौतम अदाणी च्या मागे ते ठामपणे का उभे आहेत? अशा प्रश्नांचा खासदार संजय राऊत यांनी भडीमार केला
नवी दिल्ली : भ्रष्टाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं विधान करताना मलाही जेलमध्ये टाकण्यासाठी काय-काय जाळं नाही टाकलं. पण ते त्यामध्ये पूर्णपणे अयशस्वी ठरले असं म्हटलं होतं. त्यावरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी यांच्यावर निशाना साधला. तसेच तिखट टीका करताना अदानी तुमचा कोण लागतो? अदानीच्या मागे का उभे आहात? असा सवाल केला आहे.
तसेच या देशात सध्या बदलाचेच राजकारण सुरू आहे. पण पंतप्रधान मोदी हे बदला कोणाशी घेत आहेत? का घेत आहेत? बदला घेण्यासाठी ते अडाणीला का वाचवता? देश लुटणाऱ्या गौतम अदाणी च्या मागे ते ठामपणे का उभे आहेत? अशा प्रश्नांचा भडीमार केला. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल जे विधानसभेत भाषण केलं ते मोदींबाबत पुरेसं असल्याचंही राऊत म्हणाले. तर ते मुख्यमंत्री असताना कोण कोणाशी कसं वागलं हा प्रश्न येतोय कुठे? मुख्यमंत्री असल्यापासूनच गौतम अदाणीचा उदय झाला आणि हजारो शेकडो कोटीचा भ्रष्टाचारा देशात सुरू झाला. आजही प्रधानमंत्री मोदी इतर सगळ्या विषयांवर बोलतात विरोधकांशी संघर्ष करायचा प्रयत्न करतात. ते गौतम अदाणींवर बोलत नाहीत.