क्राइम ब्रांचकडे सदर प्रकरणाचा तपास- मुंबई आयुक्त
अशी धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर प्रकरणाचा तपास क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात येईल, अशी माहितीही फणसाळकर यांनी दिली.
मुंबईः मुंबईकरांच्या सुरक्षिततेला आव्हान देणारा कोणताही कॉल आम्ही दुर्लक्षित करणार नाहीत, तो गांभीर्यानेच घेत आहोत. दहशतवादविरोधी पथकासोबत आम्ही वेळोवेळी माहिती शेअर करत आहोत, असं आश्वासन विवेक फणसाळकर यांनी दिलं. मुंबईवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला (Terror Attack) करणार असल्याची धमकी देणारा मेसेज पाकिस्तानातून आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिस आय़ुक्त विवेक फणसाळकर (Vivek Fansalkar) यांनी सदर प्रकरणी नुकतीच पत्रकार परिषदेत माहिती दिली. मुंबईवर २६-११ सारखा दहशतवादी हल्ला करणार, अशी धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर प्रकरणाचा तपास क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात येईल, अशी माहितीही फणसाळकर यांनी दिली.