न झालेल्या अपमानाचं भांडवल, संविधान पदावर निर्जीव बाहुल्यांचा खेळ; सामनातून घणाघात

न झालेल्या अपमानाचं भांडवल, संविधान पदावर निर्जीव बाहुल्यांचा खेळ; सामनातून घणाघात

| Updated on: Dec 22, 2023 | 1:39 PM

मिमिक्री प्रकरणात जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी आहे, असे म्हणत सामनातून भाजपला खोचक टोला लगावण्यात आलाय. आजच्या सामनातून बाहुल्यांचा खेळ या शीर्षकाखाली अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आलाय. संविधान पदावर निर्जीव बाहुल्यांचा खेळ सुरू आहे. बाहुल्यांचे अश्रू खोटे असतात, असे सामनातून म्हटलंय.

मुंबई, २२ डिसेंबर २०२३ : गेल्या १० वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत आणि बाहेर विरोधकांच्या नकलाच केल्या, असे म्हणत सामना या वृत्तपत्रातून उपराष्ट्रपती नक्कल प्रकरणावर सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आलीये. तर न झालेल्या अपमानाचं भांडवल पंतप्रधान आणि त्यांचा भाजप करत आहे. मिमिक्री प्रकरणात जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी आहे, असे म्हणत सामनातून भाजपला खोचक टोला लगावण्यात आलाय. आजच्या सामनातून बाहुल्यांचा खेळ या शीर्षकाखाली अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आलाय. ‘पदावरील बाहुल्यांनी अपमानाचा बाऊ करू नये,’ अशा आशयाची एक म्हण जर्मनीत आहे. देशावरचे हे संकटच म्हणावे लागेल. 1975 साली देशावर आणीबाणी लादली तेव्हा लोकशाहीसाठी छाती पिटणारे जनसंघाचेच लोक होते, पण आज त्यांचा आत्मा मेला आहे. उघड्या डोळय़ाने ते लोकशाहीचे दमन पाहत आहेत. मिमिक्री प्रकरण हे मूळ प्रश्नावरील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच आहे. संविधान पदावर निर्जीव बाहुल्यांचा खेळ सुरू आहे. बाहुल्यांचे अश्रू खोटे असतात.’ असे सामनातून म्हटलंय.

Published on: Dec 22, 2023 01:39 PM