Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कडक नोटांची टीका, 'तू चोट्टा, बायको चोट्टी', यशोमती ताईंचा उडाला भडका!

कडक नोटांची टीका, ‘तू चोट्टा, बायको चोट्टी’, यशोमती ताईंचा उडाला भडका!

| Updated on: Sep 12, 2023 | 10:30 PM

लोकसभेची निवडणूक काही महिन्यांवर असताना अमरावतीमध्ये रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा वातावरण तापवलं आहे. रवी राणा यांनी माजी मंत्री यशोमती ठाकूर, आमदार बच्चू कडू आणि आमदार बळवंत वानखडे यांना अंगावर घेतलं. पण, हे प्रकरण त्यांच्या अंगलट आलय.

अमरावती : 12 सप्टेंबर 2023 | अमरावतीमध्ये राणा दाम्पत्य विरुद्ध काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आमनेसामने आले आहेत. दहीहंडीच्या कार्यक्रमात बोलताना आमदार रवी राणा यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत यशोमती ठाकूर भाजपमध्ये येणार होत्या. मात्र, मंत्रिपद मिळत नव्हतं म्हणून त्या भाजपात आल्या नाहीत असा गौप्यस्फोट केला. या गौप्यस्फोटानंतर यशोमती ठाकूर यांनी औकातीत राहा, तू चोट्टा, बायको चोट्टी अशा शब्दात राणा दाम्पत्यावर टीका केली. मात्र, त्यावर खासदार नवनीत राणा यांनी 2019 मध्ये ताईंनी कडक नोटा घेतल्या आणि माझा प्रचार केला असा आरोप केला. या आरोपानंतर यशोमती ठाकूर चांगल्याच भडकल्या. लफंडूसपणा करु नका, तुम्हीच चोर निघाल्या अशी जोरदार टीका केली. दहीहंडीच्या कार्यक्रमातून राणा दाम्पत्यांकडून सुरु झालेली ही टीका फक्त यशोमती ठाकूर यांच्यापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. शेजारील दर्यापूरचे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांनीही रवी राणा यांच्यावर तिखट शब्दात टीका केली. दर्यापूरचे आमदार तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूरांच्या चपला उचलतात अशी जहरी टीका रवी राणा यांनी केली होती. त्यावर आमदार बळवंत वानखडे यांनी जात प्रमाणपत्रासाठी राणा केंद्राचे तळवे चाटतात असा पलटवार केला. याच रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांनाही डिवचलं. त्याचा बच्चू कडू यांनी आपल्या स्टाईलमध्ये समाचार घेतला.

Published on: Sep 12, 2023 10:30 PM