सत्तार यांच्या वाळू घोटाळ्यावरून जितेंद्र आव्हाड यांची सरकारवर बोचरी टीका; ‘सत्तार कसेही वागले तरी...’

सत्तार यांच्या वाळू घोटाळ्यावरून जितेंद्र आव्हाड यांची सरकारवर बोचरी टीका; ‘सत्तार कसेही वागले तरी…’

| Updated on: Jun 22, 2023 | 12:48 PM

सत्ता स्तापनेनंतर आतापर्यंत त्यांच्यावर तीन ते चार मोठे घोटाळ्यांचा आरोप झाला आहे. आताही त्यांच्यावर पूर्णा नदीतील वाळू प्रमाणाच्या बाहेर काढल्याचा आरोप झाला आहे. त्यांनी त्यांच्या मेडिकल कॉलेज बांधकामासाठी पूर्णा नदीची अक्षरशः चाळण केली असा आरोप तेथील माजी सरपंच यांनी केला आहे.

नागपूर : महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर घोटाळ्यांचे आरोपात काही कमी होताना दिसत नाही. सत्ता स्तापनेनंतर आतापर्यंत त्यांच्यावर तीन ते चार मोठे घोटाळ्यांचा आरोप झाला आहे. आताही त्यांच्यावर पूर्णा नदीतील वाळू प्रमाणाच्या बाहेर काढल्याचा आरोप झाला आहे. त्यांनी त्यांच्या मेडिकल कॉलेज बांधकामासाठी पूर्णा नदीची अक्षरशः चाळण केली असा आरोप तेथील माजी सरपंच यांनी केला आहे. तर त्याप्रकरणी विभागीय आयुक्तालयात तक्रार देखील दाखल केली आहे. यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अब्दुल सत्तार कसेही वागले तरी त्यांना काही होणार नाही. त्यांच्याविरोधात हे सरकार काहिही करणार नाही अशी टीका केली आहे. तर फक्त उद्धव ठाकरेंना खाली आणण्यासाठी हे 40 आमदार गेले. हे गेलेले आमदार उद्या पोकलँड घेऊन अख्खा महाराष्ट्र लुटायला बाहेर पडले तरी त्यांना रोखणारा कोणीच नाही असा घणाघात देखील त्यांनी केला आहे.

Published on: Jun 22, 2023 12:48 PM