अकोल्यातील ‘या’ भागात गाऱ्याच्या पावसानं झोडपलं, पिकांचं मोठं नुकसान

| Updated on: Apr 09, 2023 | 9:55 PM

VIDEO | गेल्या काही दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचाही जोरदार फटका बसल्यानंतर पुन्हा शेतकरी हवालदील

अकोला : गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसासह गारांचा पाऊस होत असल्याने शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचाही जोरदार फटका बसला होता. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात अनेक झाडंही उन्मळून पडली आहेत. अकोला जिल्ह्यातल्या पातुर तालुक्यात पुन्हा गारपीट झाल्यानं शेतकरी हवालदील झाल्याचे पाहायला मिळाले. आज संध्याकाळी 4.30 च्या सुमारास पुन्हा पातुर तालुक्यातल्या कोठारी, अस्टूल पास्टूल भागात बोरा एवढी गारपीट झाली. जोरदार वाऱ्यासह गारपीट झाल्याने अशाचप्रकारे नुकसान 30 मार्च रोजी देखील झाले होते. या गारपिटीमुळे गहू, आंबा, लिंबू आणि कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने पुन्हा शेतकरी संकटात सापडला आहे.

Published on: Apr 09, 2023 09:52 PM
‘लढेगा साला…मरेगा नहीं’, जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांना काय दिला नेमका इशारा
Special Report | मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा म्हणजे पर्यटन?, विरोधकांचा हल्लाबोल