Shirdi मध्ये नाईट कर्फ्यू मागे घेतल्याने काकड आरतीला भाविकांची गर्दी

| Updated on: Mar 06, 2022 | 8:41 PM

भाविकांच्या गर्दीने दर्शनरांगा फुलून गेल्या आहेत.बाजारपेठाही गजबजून गेल्या आहेत. उन्हाचा पारा चढत असल्याने साईबाबा संस्थानने उन्हापासुन भाविकांचा बचाव व्हावा याकरिता मंडप आणि पायांना चटके बसु नये यासाठी कारपेटचे आच्छादन टाकले आहेत.

शिर्डी : कोविड रुग्णांची संख्या घटल्याने अहमदनगर जिल्हयात कोविडची नियमावली शिथील करण्यात आलीय. नाईट कर्फ्यूचा निर्णय मागे घेतल्याने भाविकांना आता रात्रीच्या शेजारतीत आणि पहाटच्या काकड आरतीत उपस्थित राहाता येणार आहे. तर निर्बंध हटवल्याने शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. भाविकांच्या गर्दीने दर्शनरांगा फुलून गेल्या आहेत.बाजारपेठाही गजबजून गेल्या आहेत. उन्हाचा पारा चढत असल्याने साईबाबा संस्थानने उन्हापासुन भाविकांचा बचाव व्हावा याकरिता मंडप आणि पायांना चटके बसु नये यासाठी कारपेटचे आच्छादन टाकले आहेत. यंदाचा रामनवमी उत्सव देखील पारंपरिक पद्धतीने साजरा होणार असुन पायी पालख्या आणण्यास साईबाबा संस्थानने परवानगी दर्शवलीय…दर गुरूवारची साईपालखी सुरू करण्याची मागणी जोर धरू लागल्यानं याबाबत ही लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.