‘नितीन देसाई यांचे जाणे ही मनाला चटका लावून जाणारी घटना’; सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

‘नितीन देसाई यांचे जाणे ही मनाला चटका लावून जाणारी घटना’; सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

| Updated on: Aug 02, 2023 | 1:37 PM

तर त्यांच्या अशी एक्झीटने अनेक अभिनेत्या, अभिनेत्री आणि राजकीय क्षेत्रातील नेत्यांनाही धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्यावरून अनेक कलाकारंनी त्यांच्याबाबत बोलताना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

मुंबई, 2 ऑगस्ट 2023 | प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे अख्या चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. तर त्यांच्या अशी एक्झीटने अनेक अभिनेत्या, अभिनेत्री आणि राजकीय क्षेत्रातील नेत्यांनाही धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्यावरून अनेक कलाकारंनी त्यांच्याबाबत बोलताना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तर नितीन देसाई यांनीनैराश्याने आणि आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची प्राथमिक तपासात समोर येत आहे. यावरून राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी देसाई यांचे असे जाणे हे मनाला चटका लावून जाणारी घटना आहे. तर नितीन देसाई हा अतिशय कल्पक आर्टिस्ट होता. प्रत्येक वेळी त्यांनी उत्तम कलाकृती साकार केली. तर त्यांच्या या अशा अवेळी जाण्याने महाराष्ट्र, देश आज एका उत्तम आर्टिस्ट पासून मुकल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर त्यांच्या आत्महत्येची कारणं माहिती नाहीत नसल्याचे सांगताना आर्थिक विवंचना हा मुद्दा आत्महत्येचं कारण असण्याच कारण नाही. आणि जर तसं असेल तर पण आत्महत्या हा मार्ग नाही असेही ते म्हणालेत.

Published on: Aug 02, 2023 01:37 PM