मराठ्यांसाठी खुशखबर, रद्द झालेलं SEBC 13% आरक्षण पुन्हा मिळणार?
मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह पिटीशन सुप्रीम कोर्टानं स्वीकारलं आहे. त्यामुळे रद्द झालेलं आरक्षण पुन्हा जिवंत होण्याची आशा निर्माण झाली आहे. ४ न्यायमूर्तीचं खंडपीठ या क्युरेटिव्ह पिटीशनवर सुनावणी करणार आहे.
मुंबई, २३ डिसेंबर २०२३ : मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह पिटीशन सुप्रीम कोर्टानं स्वीकारलं आहे. त्यामुळे रद्द झालेलं आरक्षण पुन्हा जिवंत होण्याची आशा निर्माण झाली आहे. ४ न्यायमूर्तीचं खंडपीठ या क्युरेटिव्ह पिटीशनवर सुनावणी करणार आहे. यामध्ये स्वतःसरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायाधीश संजय कौल, संजीव खन्ना आणि बीआर गवई हे आहेत. येत्या २४ जानेवारी रोजी यावर पुन्हा सुनावणी होणार आहे त्यामुळे तीन शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. क्यूरेटिव्ह पिटीशनच्या बाजूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठा समन्वयक विनोद पाटील आहेत. तर विरोधात गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील आणि इतर लोकं आहेत. क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारल्याने आता ३ गोष्टींची शक्यता आहे. १ म्हणजे २४ जानेवारी सरन्यायाधीशांच्या चेंबरमध्ये खुली सुनावणी घ्यायची का? हे ठरेल. दुसरी शक्यता म्हणजे खुली सुनावणी घेण्याचं ठरलं तर २४ जानेवारीनंतरच्या येणाऱ्या शुक्रवारी पुढची तारीख कळेल, आणि २४ जानेवारीलाच सुनावणीतच टक्केवारी कमी जास्त करून SEBC आरक्षणाला हिरवा कंदीलही दिला जाऊ शकतो.