Special Report | बिपरजॉय चक्रीवादळ कुठं धडकणार?, कुठं लँडफॅाल? कसं पुढे सरकतयं वादळ?
VIDEO | बिपरजॉय चक्रीवादळाचा कोणत्या राज्याला धोका, हवामान खात्यानं नागरिकांना काय दिला इशारा?
मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळ आता गुजरात आणि पाकिस्तानच्या दिशेने पुढे सरकतंय. तर चक्रीवादळ गुजरातच्या किनारी धडकणार असल्याचा अंदाजही वर्तविला जातोय. मुंबईतही कालपासून वेगाने वारे वाहताय. प्रचंड वेगाने बिपरजॉय चक्रीवादळ हे भारत पाकिस्तानच्या दिशेने पुढे सरकतंय. वादळाचा केंद्रबिंदू किनारपट्टीपासून लांब असला तरी वादळाच्या प्रभावामुळे किनारपट्टीवर लाटा उसळू लागल्या आहेत. मोठाल्या उंच लाटा रत्नागिरीच्या गणपतीपुळे या समुद्रकिनाऱ्यावर पाहायला मिळाल्या. गुजरातच्या जुनागडमध्येही वादळाचा प्रभाव जाणवू लागलाय. मुंबईच्या समुद्रापासून चक्रीवादळाचा केंद्रबिंदू खूप लांब होता. तरीही या वादळाच्या प्रभावामुळे मुंबईमध्ये प्रंचड वेगाने वारे वाहताना दिसले. तर बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनारी धडकणार का?, कसं पुढे सरकतयं चक्रीवादळ? लँडफॅाल कुठे होणार? बघा स्पेशल रिपोर्ट