दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे वाद चिघळला; उद्धव ठाकरे यांच्या सभेआधी मालेगावात हालचाली वाढल्या
Dada Bhuse V/s Advay Hiray : उद्धव ठाकरे यांची आज मालेगावमध्ये सभा होतेय. या सभेआधी महत्वाची घडामोड घडतेय. पाहा व्हीडिओ...
नाशिक : उद्धव ठाकरे यांच्या मालेगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि अद्वय हिरे यांच्यातला वाद विकोपाला गेला आहे.अद्वय हिरे यांच्या शिक्षण संस्थेच्या भरती प्रकरणात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप करत काही पीडित आंदोलक आज उपोषणाला बसले आहेत. आम्ही या संस्थेत कामाला लागण्यासाठी पैसे देऊन देखील आम्हाला नोकरी देण्यात आले नाही, असे आरोप या आंदोलकांनी केले आहेत. अद्वय हिरे यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे आता हा वाद कोणत्या दिशेने जातो हे पाहावं लागेल.
Published on: Mar 26, 2023 01:29 PM
Latest Videos
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट

